अरविंद केजरीवाल यांच्याशी केलेल्या तुलनेवरून संतापलेल्या राखी सावंतने सोमवारी मुंबईच्या पोलीस आयुक्त आणि गृहसचिवांना पत्र लिहून आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्या दिग्विजय सिंह यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर ५० कोटी रुपयांचा दावा ठोकण्याचा इशाराही राखीने दिला आहे. पोलीस आयुक्त, गृहसचिव आणि गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अशा तिघांना दिलेल्या पत्रात राखीने म्हटले आहे की, दिग्विजय सिंह यांना आपण व्यक्तिश: ओळखत नाही. परंतु आपल्या चारित्र्याशी संबंधित वक्तव्ये करून ते आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलिन करीत आहेत. दिग्विजय सिंह यांचे हे वक्तव्य म्हणजे आपल्या ‘पवित्र्य’ चारित्र्यावर हल्ला आहे, असेही तिने म्हटले आहे. दिग्विजय सिंह यांनी रविवारी ट्विटरवर केजरीवाल हे राखी सावंत सारखेच असून दोघेही सतत काहीतरी दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु त्यांच्याकडे दाखविण्यासारखे काहीच नाही, अशा शब्दांत खिल्ली उडवली होती.   

Story img Loader