मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत पात्र रहिवाशांना तीन वर्षांच्या घरभाड्याचा धनादेश वितरीत करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) घेतला आहे. हे धनादेश वितरण भव्यदिव्य सोहळ्यात करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची तयारी या दोन्ही प्राधिकरणांकडून झाली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळत नसल्याने धनादेश वितरणाचा कार्यक्रम रखडल्याचे कळते आहे.

पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीए संयुक्त भागीदारी तत्वावर रमाबाई आंबेडकर नगरचे पुनर्वसन प्रकल्प राबविणार आहे. त्यानुसार रमाबाई आंबेडकर नगरातील १६५७५ झोपड्यांपैकी १४ हजार ४५४ झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. उर्वरित झोपड्या किनारपट्टी नियंत्रण नियमावलीत बाधित असल्याने वगळण्यात आल्या आहेत. दरम्यान १४ हजार ४५४ झोपडीधारकांपैकी आतापर्यंत १० हजार झोपडीधारकांची पात्रता निश्चिती पूर्ण झाल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. रमाबाई आंबेडकर नगरच्या प्रत्यक्ष बांधकामाला शक्य तितक्या लवकरच सुरुवात करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. त्यानुसार झोपड्या त्वरीत रिकाम्या करुन जागा मोकळी करुन देण्याची मागणी सातत्याने एमएमआरडीएकडू झोपु प्राधिकरणाकडे होत आहे. या मागणीप्रमाणे झोपु प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात क्लस्टर एन-१९ मधील ४०५३ झोपड्या हटवित एमएमआरडीएने जागा मोकळी करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा या झोपडीधारकांना १५ हजार रुपये प्रतिमाह प्रमाणे तीन वर्षांच्या घरभाड्याचा धनादेश वाटप करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तर हे धनादेश वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, एका कार्यक्रमात करण्याचा निर्णय दोन्ही प्राधिकरणाने घेतला आहे. मात्र मुख्यमं त्र्यांची वेळ मिळत नसल्याने धनादेश वितरण रखडले असल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकार्याने दिली.

heartwarming video | a Pune rickshaw driver
“…नंतर पैसे द्या” पुण्यातील रिक्षाचालकाने दाखवला मोठेपणा; Video होतोय व्हायरल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
MVA seat-sharing agreement for Maharashtra polls
Maharashtra Election 2024: याद्यांच्या प्रतीक्षा कायम! ‘मविआ’त मतभेद उघड; महायुतीतही जागावाटपावर मौन
1932 citizens registrations for affordable housing under pmrda scheme
पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद; सदनिकेसाठी १ हजार ९३२ नागरिकांची नोंदणी
is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
cash seized Maval, Maval, Pimpri, Maval latest news, Maval cash news,
पिंपरी : खेड शिवापूरनंतर आता मावळमध्ये १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त
rpi ramdas athawale
विधानसभा निवडणुकीत ‘रिपाइं’ला जागा देण्याची मागणी, जागा न मिळाल्यास महायुतीच्या प्रचारात सहभागी न होण्याचा इशारा
Leaders do not come to ask for votes banners at Pangul Colony in Nagpur
नेत्यांनो, मत मागायला येऊ नका! नागपुरातील पांगूळ वसाहतीत फलक

हेही वाचा : बेकरीजन्य पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका; भंगारातील फर्निचरमधून उत्सर्जित होणारी रसायने आणि वायू हानिकारक

एमएमआरडीए आणि झोपु प्राधिकरणाकडून मुख्यमं त्र्यांच्या हस्ते १९ आॅगस्टला रमाबाई आंबेडकर नगर येथे धनादेश वितरण करण्यात येणार होते. या कार्यक्रमाची तयारी सुरु होती. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने १९ आॅगस्टला धनादेश वितरण होऊ शकले नाही आणि धनादेश वितरण रखडली. परिणामी पुनर्वसनाच्या कामास विलंब होत आहे. दरम्यान मुख्ममं त्र्यांची वेळ मिळावी आणि धनादेश वितरण प्रक्रिया पूर्ण करत झोपड्या रिकाम्या करुन घेण्याच्या कामास सुरुवात व्हावी यासाठी एमएमआरडीए आणि झोपु प्राधिकरण प्रयत्न करत आहेत. लवकरच वेळ मिळेल आणि धनादेश वाटप होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.