शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचीही सभा मोठी व्हायची, पण त्यांना मतं मिळत नव्हती. सभा मोठी झाली म्हणून सगळी मतं मिळतील असं नाही असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर – असदुद्दीन ओवेसी यांच्या बहुजन वंचित विकास आघाडीवर बोलताना दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारिप-एमआयएमच्या आघाडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. त्यांची युती आमच्याच फायद्याची असून भाजपा – आरपीय युतीला याचा फायदा होईल असंही ते म्हणाले आहेत.

‘प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी एकत्र आल्याने आमचाच फायदा होणार आहे. नरेंद्र मोदींबद्दल लोकांचं चांगलं मत आहे, त्यांच्या युतीचा आम्हाला फायदा होईल. अकोल्याच्या बाहेर प्रकाश आंबेडकर यांना फायदा होणार नाही. दलित मतांमधील महत्वाची मतं आमच्यासोबत असणार आहेत’, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

सभेला झालेल्या गर्दीवर बोलताना, ‘कार्यकर्ते आणि जनता आमच्यासोबत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याही सभेला खूप गर्दी व्हायची, पण त्यांना मतं मिळत नव्हती’, असं सांगितलं. मुस्लिम मतांवर बोलताना सगळी मतं आंबेडकर-ओवेसी यांना मिळतील असं काही नाही. आम्हाला पण मतं मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.