शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर रामदास आठवलेंची टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप व रिपब्लिकन पक्षाची महायुती व्हावी, अशी आपली इच्छा आहे, परंतु शिवसेना सोबत नसेल, तर रिपइंची भाजपबरोबर युती राहील, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता असतानाही शिवसेनेकडून रिपब्लिकन पक्षाला सापत्न वागणूक दिली जाते, अशी टीका आठवले यांनी केली.

मुंबईसह अन्य दहा महानगरपालिकांच्या आता कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पाश्र्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते अविनाश महातेकर, मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनावणे आदी वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. आझाद मैदानावरील पक्षाच्या कार्यालयात निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यात महिलांचीही संख्या लक्षणीय होती. आठवले यांनी मुंबईतील २२७ पैकी १२५ प्रभागातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेना, भाजप व रिपाइंची महायुती झाली होती. त्यावेळी रिपइंला २९ जागा देण्यात आल्या होत्या. परंतु एकच जागा निवडून आली. रिपाइंची मते भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाली, परंतु मित्र पक्षांची मते आमच्या उमेदवारांना मिळाली नाहीत, त्यामुळे अपयश आले, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. या वेळी तीनही पक्षांची महायुती व्हावी अशी आपली इच्छा आहे. महायुती झाली तर रिपाइंला २५ ते ३० जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र शिवसेना सोबत नसेल, तर रिपाइंची भाजपबरोबर युती राहील, असे त्यांनी जाहीर केले. भाजपने रिपाइंला ६० ते ७० जागा सोडाव्यात अशी मागणीही आठवले यांनी केली.