“उद्धव ठाकरे या महाराष्ट्रात आता चालणार नाही तुमचे नखरे, कारण आता आमच्याबरोबर आहेत राज ठाकरे”, असं म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर आज महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या कवितेतून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली.

हेही वाचा – राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसमोरच केला पंडित नेहरूंचा उल्लेख; नेमकं काय घडलं?…

Raj Thackeray on Viral Video
Raj Thackeray : “लोकांच्या मनोरंजनाकरता बाई भोजपुरी गाण्यावर नाचतेय”, ‘त्या’ व्हायरल VIDEO वर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
sada sarvankar marathi news
अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा? सदा सरवणकरांचे माघारीचे संकेत? म्हणाले, “कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय…”
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Sharad Pawar
Sharad Pawar : “६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी, मी आणि उद्धव ठाकरे..”, शरद पवारांचं वक्तव्य
What Raj Thackeray Said About Shivsena NCP Split
Raj Thackeray : “उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे पक्ष फुटले, कारण..”, राज ठाकरेंनी नेमकं काय सांगितलं?
Aditya Thackeray
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? आदित्य ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी…”
sada sarvankar post for raj thackeray support
“माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, मला…”; सदा सरवणकरांचे राज ठाकरेंना भावनिक आवाहन!

काय म्हणाले रामदास आठवले?

“महाराष्ट्रात आणि देशात लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करतो आहे. या देशात बाबासाहेबांचे संविधान मजबूत आहे. या देशाचे पंतप्रधान मजबूत आहेत. या राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार, राज ठाकरे आणि मी मजबूत आहे. त्यामुळे तुम्हाला जे बोलायचं असेल, ते बोला चार तारखेला आम्हीच तुम्हाला देणार आहोत जबरदस्त टोला”, अशी खोचक टीका रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर केली.

“या ठिकाणी आम्ही सर्व इथे आलो आहोत. मोदींचे नेतृत्व विकासाच्या दिशेने जात आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईच्या विकासासाठी केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये दिले आहेत. अजूनही पैसे मिळणार आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कोणाचाही डाव नाही. मुंबई ही राज्याची राजधानी आहे. या मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्याला झोडल्याशिवाय राहणार नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – महायुतीच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे पाच मागण्या; म्हणाले “सर्…

“निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आणि बाबासाहेबांचे संविधान धोक्यात आहे, असा आरोप केला जातो. मात्र, बाबासाहेबांचे संविधान धोक्यात नाही. याउलट महाविकास आघाडी धोक्यात आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणीही बदलू शकत नाही, अशी अफवा पसरवून दलित समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, यावेळी त्यांनी कवितेतून उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. “उद्धवजी या महाराष्ट्रात आता चालणार नाही तुमचे नखरे, कारण आता आमच्याबरोबर आहेत राज ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही त्यांच्याकडे का गेला उद्धव ठाकरे”, असे ते म्हणाले.