रामदास आठवले यांची भूमिका; ‘सनातन’च्या चौकशीची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपसोबत युती असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हिंदू राष्ट्र संकल्पनेला आपला विरोध असल्याचे जाहीर केले. सनातन संस्थेवर सध्या गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या संस्थेची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

संविधानातील धर्मनिरपेक्ष या शब्दामुळेच भारताची एकात्मता मजबूत आहे. हा शब्द वगळला तर संविधान आणि राष्ट्राची एकता खिळखिळी होईल. त्यामुळे कोणीही मागणी केली तरी हा शब्द संविधानातून काढता येणार नाही. तसा प्रयत्न झाला तर रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारेल, असा इशारा त्यांनी दिला.

हिंदू राष्ट्र संकल्पनेला आपल्या पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. सनातन संस्थेवर झालेले आरोप गंभीर असल्याने या संस्थेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. कोणताही विचार हत्या करून संपणार नाही. हिंसक कारवायांचे कोणी समर्थन करू नये. बंदी आणून फारसा फरक पडणार नाही. मात्र हिंसक कारवायांमध्ये असणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष एकत्र आले तर पंतप्रधान कोण होणार या मुद्यावरून त्यांचे ऐक्य फुटेल, मात्र देशात भाजप आघाडी जिंकेल आणि नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली पुन्हा सरकार अस्तित्वात येईल, असे भाकीत त्यांनी वर्तविले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale hindu nation concept
Show comments