रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र येणार असतील, तर आपण भाजपबरोबरची युती तोडायला तयार आहोत, अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी मांडली. त्यासाठी एखादी समिती स्थापन करावी व ऐक्याचा आराखडा तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली. दलित पँथरचे एक संस्थापक, लेखक ज. वि. पवार यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक-साहित्यिक चळवळीतील योगदानाबद्दल त्यांच्यावर गौरव विशेषांक काढण्यात आला. त्यानिमित्त आयोजित केलेल्या खास समारंभात बोलताना आठवले यांनी आंबेडकरी चळवळीची विखुरलेली ताकद पुन्हा एकदा एकवटण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन केले. बौद्ध महासभेचे नेते भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

Story img Loader