भारताच्या उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांच्या मदतीचे निमित्त साधून रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी जानेवारीमध्ये अमेरिकेला जाण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. या भेटीत म्हणे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेटही घेणार आहेत.
देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत अटक झाल्यानंतर रिपाईच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील आंदोलन सुरू केले आहे. या पाश्र्वभूमीवर देवयानी खोब्रागडे यांचे वडिल उत्तम खोब्रागडे यांनी शनिवारी रामदास आठवले यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी आपण जानेवारीमध्ये अमेरिकेस जात असल्याचे स्पष्ट केले.
देवयानी खोब्रागडे यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी बराक ओबामा यांची भेट घेऊन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जोपर्यंत देवयानी खोब्रागडे यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत रिपाईचे आंदोलन सुरूच राहील, असेही ते म्हणाले.
रामदास आठवले ओबामांची भेट घेणार
भारताच्या उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांच्या मदतीचे निमित्त साधून रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी जानेवारीमध्ये अमेरिकेला जाण्याचा
आणखी वाचा
First published on: 22-12-2013 at 03:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale set to meet barack obama in devyani khobragade case