भारताच्या उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांच्या मदतीचे निमित्त साधून रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी जानेवारीमध्ये अमेरिकेला जाण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. या भेटीत म्हणे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेटही घेणार आहेत.
देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत अटक झाल्यानंतर रिपाईच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील आंदोलन सुरू केले आहे. या पाश्र्वभूमीवर देवयानी खोब्रागडे यांचे वडिल उत्तम खोब्रागडे यांनी शनिवारी रामदास आठवले यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी आपण जानेवारीमध्ये अमेरिकेस जात असल्याचे स्पष्ट केले.
देवयानी खोब्रागडे यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी बराक ओबामा यांची भेट घेऊन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जोपर्यंत देवयानी खोब्रागडे यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत रिपाईचे आंदोलन सुरूच राहील, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा