आंबेडकर चळवळीला काही जणांनी राजकीय पक्षांच्या दारामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला आहे. महानिर्वाण दिनी (६ डीसेंबर) एकदाही आंबेडकर स्मारकासमोर नतमस्तक न होणाऱ्यांना नामांतरणाबाबत किलनचिट कशी दिली असा असा टोला रामदास आठवले यांचे नाव न घेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारला. उपमुख्यमंत्री पवार हे पनवेल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमावेळी बोलत होते. पवार यांनी राजकीय पोळी भाजणारे पक्ष अशा शब्दात महायुतीची संभावना केली.
राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या लेखानुदानात दलित आणि इतर मागासवर्गीयांसाठी सरकारने ६ हजार कोटी रुपयांची तजवीज केल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. हल्ली भावी पिढीमध्ये सोशल मिडीयामुळे वाचनाची आवड कमी होत चालली आहे. मात्र पनवेल नगरपालिकेने उभारलेल्या या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनात अभ्यासिका, ग्रंथालयाची सोय केल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, असे पवार यांनी सांगितले.
पनवेलमध्ये अजित पवार हे पहिल्यांदाच आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी अजित यांचा उल्लेख राज्याचा राजा असा केला. पालिकेच्या अनेक रखडलेल्या योजनांसाठी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे ४० कोटींचे दान मागितले.
आंबेडकर चळवळ राजकीय पक्षांच्या दावणीला
आंबेडकर चळवळीला काही जणांनी राजकीय पक्षांच्या दारामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला आहे. महानिर्वाण दिनी (६ डीसेंबर) एकदाही आंबेडकर स्मारकासमोर
First published on: 28-02-2014 at 03:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale slams ajit pawar