शिवसेनेचे नेते आणि आमदार रामदास कदम यांनी विधीमंडळ अधिवेशनात आपल्या निवृत्तीनिमित्त बोलताना आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलं. तसेच मी कधीकधी भडकतो-चिडतो पण प्रविण दरेकरांनी सांगितल्याप्रमाणे तितकाच मी मवाळ देखील आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी कोकणातील प्रश्नावर आपली भूमिका मांडत न्याय देण्याची मागणीही केली.

रामदास कदम म्हणाले, “एका गोष्टीचं माझ्या मनात शल्य आहे. माझ्या कोकणासाठी जी सिंचनाची व्यवस्था आहे ती स्वातंत्र्यानंतर फक्त दीड टक्का आहे. अगदी मंत्री असताना मी अनेकदा हा विषय कॅबिनेटमध्ये लावून धरला. त्यात मला यश मिळालं नाही. सगळ्यात जास्त पाऊस कोकणात पडतो आणि सगळ्यात जास्त अन्याय देखील कोकणावर होतो. पश्चिम महाराष्ट्रात सिंचन टक्का ५५ टक्के आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस पडतो त्या कोकणात दीड टक्के सिंचन आहे याचं शल्य माझ्या मनात आहे.”

narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
rohit pawar on raj thackreray vidarbha visit
Rohit Pawar : “तुम्ही महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते, फक्त…”; राज ठाकरेंबाबत नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
“शरद पवार, उद्धव ठाकरेंना त्‍यांचे राजकारण लखलाभ…”, बदलापूरच्या घटनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंकडून….
Badlapur, Vaman Mhatre, Shiv Sena, abuse allegations, Adarsh School, female journalist,
मला बदनाम करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी, शिवसेना बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे स्पष्टीकरण
Former mayor of Badlapur Vaman Mhatre expressed his anger on a female reporter who covered the Badlapur rape incident
Badlapur School Case : वामन म्हात्रे यांची आधी वादग्रस्त टिप्पणी, नंतर सारवासारव
Sunil Tatkare Ajit Pawar
Sunil Tatkare : महायुतीत मिठाचा खडा! भाजपा कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्याने तटकरेंचा संताप; म्हणाले, “आपल्या एकतेला गालबोट…”

“भविष्यात या सभागृहाच्या माध्यमातून मला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे. कोकण वैधानिक महामंडळ बरखास्त झालेय. मी त्याच्या सर्व फाईल्स मुद्दाम सोबत आणल्यात. त्या मी तुमच्याकडे देईन. कोकणासाठी देखील महामंडळ व्हावं, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे,” असं कदमांनी सांगितलं.

“…असं कुठलंही काम माझ्या हातून होणार नाही”

रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भाषणाचीही आठवण काढली. ते म्हणाले, “माझ्या मनात कुठलंही दुःख नाही. शिवसेना प्रमुखांचं सर्वात शेवटचं भाषण होतं, त्यात त्यांनी अरे बाबांनो माझ्यानंतर उद्धवला साथ द्या असे शब्द काढले. म्हणून मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगतो आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला दुःख होईल, असं कुठलंही काम माझ्या हातून होणार नाही.”

हेही वाचा : “अनिल परब म्हणजेच जर शिवसेना असेल तर…” ; रामदास कदम यांचं मोठं विधान!

“कधीकधी कुटुंबात भांड्याला भांडी लागतात त्यात विपर्यास करण्याची गरज नाही. मतभेद होत असतात, पण ते तात्पुरते असतात. मी कधीकधी भडकतो, चिडतो, माझा स्वभाव तसाच आहे, पण दरेकरांनी सांगितल्याप्रमाणे मी तितकाच मायाळू सुद्धा आहे,” असंही रामदास कदम यांनी नमूद केलं.