शस्त्रक्रिया करताना मृत्यू झाल्याचा आरोप करीत रुग्णाचा नातेवाईकांनी उल्हासनगरमधील शिवनेरी रुग्णालयाची मोडतोड केल्याचा प्रकार रविवारी घडला. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी आल्या आहेत.
हेमंत खत्री(२८) यांच्या पोटातील नस तुटल्याने त्यांच्यावर शिवनेरी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. रविवारी पहाटे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना शस्त्रक्रिया खोलीत नेल्यानंतर काही वेळेत डॉक्टरांनी ते मृत जाहीर केले. त्यानंतर सुमारे पंधरा नातेवाईकांनी डॉ. प्रकाश आहुजा, डॉ. महेंद्र रोचलानी यांना मारहाण व रुग्णालयात मोडतोड केली. नातेवाईकांनी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. चौकशीनंतर गुन्हा दाखल करू, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश मोकाशी यांनी सांगितले. डॉ. आहुजा यांनी सांगितले की, शस्त्रक्रिया खोलीत नेतानाच हेमंत यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली नव्हती. या प्रकरणी आपण १५ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
रुग्णालयाची मोडतोड
शस्त्रक्रिया करताना मृत्यू झाल्याचा आरोप करीत रुग्णाचा नातेवाईकांनी उल्हासनगरमधील शिवनेरी रुग्णालयाची मोडतोड
First published on: 16-09-2013 at 02:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rampage in hospital after death of a patient while surgery