आपले राजकीय वजन वाढविण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे परिवाराने आरोप केले असून मराठी शाळांमधून मराठी भाषा काढून टाकण्यासाठी उच्च न्यायालयात कधीही याचिका सादरच केलेली नाही आणि त्यामुळे न्यायालयाने ती फेटाळलीही नाही, असे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन कागदपत्रे राणे परिवाराने जाहीर करावीत, मी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागेन, असे आव्हान सोमय्या यांनी दिले. आपण कोणताही गुन्हा केला असल्यास पोलिसांकडून चौकशी करण्याची मागणीही सोमय्या यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांची भेट घेऊन केली. नितेश राणे यांनी सोमय्या यांच्यावर उच्च न्यायालयात मराठी भाषेविरूध्द याचिका केल्याचा आरोप केला होता. या आरोपाला त्यांनी गुरुवारी उत्तर दिल़े

Story img Loader