मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) यंदा ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पुष्पोत्सव होणार असून या महोत्सवाचे हे २८ वा वर्ष आहे. मुंबईकरांना हजारो प्रजातीची रंगबिरंगी फुले आणि अन्य वनस्पती, त्यांच्या आकर्षक रचना, सजावट पाहण्याची संधी मिळणार आहे.

समृद्ध वारसा असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात दरवर्षी पुष्पोत्सवाचे आयोजन केले जाते. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपआयुक्त चंदा जाधव यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारपासून तीन दिवसीय वाहतूक ब्लॉक

या पुष्पोत्सवात विविध प्रजातीची फुलझाडे, फळांची रोपटी, रंगबिरंगी फुलझाडे, औषधी वनस्पती आदी मिळून सुमारे ५ हजार रोपांचा या पुष्पोत्सवात समावेश असेल. फुलझाडे आणि फळझाडांच्या प्रदर्शनासोबतच उद्यानविषयक वस्तूंची विक्री, झाडांसाठी लागणारे खत आदींची दालने पर्यावरणप्रेमींसाठी खुली करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – मुंबई : पत्राचाळीतील विजेत्यांना उद्यापासून देकार पत्र

गतवर्षी ॲनिमल किंगडम या संकल्पनेवर आधारित पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विविध रंगबिरंगी फुलांचा वापर करून प्राणी – पक्षांच्या प्रतिकृती साकारण्यात आला होत्या.आतापर्यंत पार पडलेल्या पुष्पोत्सवांना जपान, मलेशिया, कॅनडा, मॉरिशस या देशांच्या राजदूतांसोबतच विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भेट दिली आहे.

Story img Loader