मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त बुधवार, २२ मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. या आठवड्यात राणीची बाग बुधवारऐवजी गुरुवारी बंद राहणार आहे. भायखळा येथील राणीची बाग दर बुधवारी बंद असते. मात्र यापूर्वी महानगरपालिकेने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवशी राणीची बाग जनतेसाठी खुली असते. राणीची बाग बुधवारी खुली असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ती बंद ठेवण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राणीच्या बागेतील तिकीट खिडकी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० दरम्यान सुरू असते. राणीची बाग सायंकाळी ६.०० वाजता बंद होते. राणीच्या बागेतील प्रवेशासाठी प्रतीव्यक्ती ५० रुपये शुल्क असून वय वर्ष ३ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी २५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. आई – वडिल आणि १५ वर्षे वयापर्यंतची दोन मुले अशा चार व्यक्तींच्या कुटुंबासाठी १०० रुपये एकत्रित शुल्क आकारण्यात येते.