मुंबई : भायखळ्याच्या जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतील शेवटच्या हत्तीणीचा अलिकडेच मृत्यू झाला. अनारकली असे या ५९ वर्षीय हत्तीणीचे नाव होते. देशातील कोणत्याही प्राणीसंग्रहालयात हत्ती ठेवण्यास मनाई करणारा निर्णय केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने २०१६मध्ये घेतला आहे. त्यामुळे आता राणीच्या बागेतील हत्तींचा अधिवास पोरका झाला आहे.

जिजामाता उद्यानातील अनारकली हत्तीण गेल्या महिन्यात एक दिवस संध्याकाळी अचानक जमिनीवर बसली, त्यानंतर तिला उठताच आले नाही. अनारकली ही राणीच्या बागेतील सर्वात वयोवृद्ध प्राणी होती. १९७७मध्ये अनारकली व लक्ष्मी या दोन्ही हत्तीणी येथे आल्या होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या जोडीला एक नर हत्ती आणला   होता. मात्र नंतर त्याला केरळला परत पाठवण्यात आले होते. या दोघींपैकी लक्ष्मीचा चार वर्षांपूर्वी संधिवाताने मृत्यू झाला. तेव्हापासून अनारकली एकटीच राहत होती.

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress Sapna Singh teen son found dead in UP (1)
मित्रांबरोबर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Kurla Bus Accident
Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
bjp leader and mlc yogesh tilekar uncle satish wagh killed after kidnapped in pune
भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून

हेही वाचा >>>उद्धव- राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण; कौटुंबिक कार्यक्रमात भेट

दीडशे किलोचा ट्युमर

अनारकलीला दफन करण्यापूर्वी तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यामध्ये तिच्या शरीरात तब्बल दीडशे किलोचा ट्युमर असल्याचे आढळून आले होते. मात्र ती जिवंत असताना त्याची कोणतीही लक्षणे दिसली नव्हती. मोठ्या प्राण्यांमध्ये याप्रकारची चाचणी करणे अवघड असते, असे जिजामाता उद्यानाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना पुढील वर्षीही शाडूची माती मोफत देणार

भविष्यात हत्तींना मनाई

हत्तींचे सर्वसाधारण वयोमान हे ६० ते ६५ वर्षांपर्यंत असते. जंगलातील हत्तींपेक्षा प्राणी संग्रहालयात हत्ती अधिक जगतात. मात्र हत्तींना दिवसभर खूप चालावे लागते. दर दिवशी हत्ती किमान १८ ते २० किमी अंतर चालतात. एवढी जागा प्राणी संग्रहालयात नसते. त्यामुळे प्राणी संग्रहालयात सध्या असलेल्या हत्तींचा सांभाळ करावा व यापुढे नवीन हत्ती ठेवू नेय असा निर्णय केंद्रीय प्राणीसंग्रहायल प्राधिकरणाने २०१६मध्ये घेतला. त्यामुळे नवीन हत्ती आणणार नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मोठे प्राणी जमिनीवर बसले की त्यांच्या जिवाला धोका असतो. त्यांचे पोटातील सगळे अवयव हृदयाच्या दिशेने सरकल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका असतो. त्यामुळे आम्ही रात्रीच क्रेन मागवून अनारकलीला उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला स्वत:हून उभे राहता येत नव्हते. त्यातच ती दुसऱ्या दिवशी मरण पावली.- संजय त्रिपाठी, संचालक, जिजामाता उद्यान

Story img Loader