अश्लील चित्रफित बनवून एका महिलेकडे ३ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे. मीरा रोड येथे राहणाऱ्या या फिर्यादी महिलेला घर हवे होते. याच भागातील हुस्ना अफजल शेख (३५) यास्मिन शेख उर्फ शबनम (३२) आणि माही सिंग (३०) या तीन महिलांच्या संपर्कात ती आली. त्यांनी तिला नया नगर येथे एक घर दाखविण्यास नेले. मात्र त्या खोलीत नेऊन तिच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि कानातील सोन्याची रिंग काढून तिची अश्लील चित्रफित बनवली.

Story img Loader