अल्पवयीन तरुणीला अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी दुर्गाकुमार यादव (२०) या सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.
यादव मालाडच्या दफ्तरी रोड येथील एका बंगल्यात सुरक्षा रक्षकाचे काम करतो. गोरेगाव पूर्वेच्या एका नृत्यशाळेत एक १७ वर्षांची तरुणी नृत्य शिकण्यासाठी येत होती. यादवने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला मेसेज पाठवायला सुरुवात केली होती. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. परंतु नंतर यादवने तिला अश्लील मेसेजेस पाठविण्यास सुरुवात केल्यानंतर तिने पालकांच्या मदतीने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
अश्लील मेसेज पाठविणारा सुरक्षा रक्षक गजाआड
अल्पवयीन तरुणीला अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी दुर्गाकुमार यादव (२०) या सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. यादव मालाडच्या दफ्तरी रोड येथील एका बंगल्यात सुरक्षा रक्षकाचे काम करतो. गोरेगाव पूर्वेच्या एका नृत्यशाळेत एक १७ वर्षांची तरुणी नृत्य शिकण्यासाठी येत होती.
First published on: 23-02-2013 at 05:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ransom sms sender security guard arrested