मतदार संघातील व्यवहार, विधीमंडळातील कामगिरी आणि संघटनेशी बांधीलकी ही आमदारांसाठी यशाची त्रिसूत्री असून, त्या आधारे निवडून येणे, हे शक्य असते, हे कायम ध्यानात ठेवा अशी सूचना भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी केले. भाजप आमदारांचा तीन दिवसीय अभ्यासवर्गाचा समारोप दानवे यांनी केला.
पूर्वी अनेक वेळा निवडून येणे हे आजच्या तुलनेने सोपे होते, पण आता समाजाचे, लोकांचे, प्रसार माध्यमांचे सतत तुमच्यावर लक्ष असते. त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागते. आपला स्वच्छ व पारदर्शक व्यवहार, मतदार संघातील संपर्क यावर लोक आपली प्रतिमा तयार करत असतात. आपण विधानसभा, लोकसभा जिंकतो, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हवे तसे यश मिळत नाही. याचा विचार करून  मतदार संघातील निवडणुकांची तयारी आतापासूनच करा, असे आवाहनही त्यांनी आमदारांना केले.

Story img Loader