भाजप नेते आणि माजी आमदार मधू चव्हाण (६१) यांच्यावर काळाचौकी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वी भाजपत असलेल्या ५० वर्षीय कार्यकर्त्यां महिलेने ही तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २० वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून चव्हाण यांनी आपली फसवणूक करीत बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या महिलेने मंगळवारी काळाचौकी पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली होती. १९९३ पासून मधू चव्हाण यांनी आपल्याशी संबंध ठेवले होते. माझ्याशी ते लग्न करणार असल्याचे वारंवार सांगत होते. मात्र त्यांनी लग्न न करता आपली फसवणूक केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक) प्रवीण साळुंखे यांनी सांगितले की, विविध ठिकाणी मधू चव्हाण यांनी बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने दिली आहे. चव्हाण यांनी या महिलेला फ्लॅट देण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र त्यांनी ते पूर्ण केले नाही. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप चव्हाण यांना अटक करण्यात आलेली नाही. चव्हाण यांनी हे आरोप फेटाळले असून राजकीय वैमनस्यातून ते करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.