भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यामध्ये चव्हाण यांच्याविरुद्ध मंगळवारी संध्याकाळी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नाचे आमीष दाखवून चव्हाण आपल्यावर गेल्या २० वर्षांपासून बलात्कार करत असल्याची लेखी तक्रार एका महिलेने काळा चौकी पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी पोलीसांनी चौकशी सुरू केली असून, चव्हाण यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

Story img Loader