मुंबईच्या दादर परिसरातील छबिलदास शाळेमध्ये एका नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक समारंभाच्या कार्यक्रमानंतर ही घटना घडली. या कार्य़क्रमासाठी बाहेरून केटरिंगच्या कामासाठी काहीजणांना बोलविण्यात आले होते. त्यापैकीच एका २० वर्षीय तरूणाने या मुलीसोबत हे कृत्य केले. वार्षिक समारंभाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व मुले आपापल्या घरी निघून गेली होती. मात्र, ही मुलगी आपल्या पालकांची वाट पाहत स्टाफ रूममध्ये बसली होती. दरम्यानच्या वेळात ती शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या स्वच्छतागृहात गेली होती. त्यावेळीच या तरूणाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर संबंधित मुलीचे पालक जेव्हा शाळेत आले तेव्हा तिने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या पालकांनी लगेचच पोलिसांत धाव घेत यासंबंधी तक्रार दाखल केली. त्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी कारवाई करत या तरूणाला अटक केली असून त्याच्यावर ३७६ कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादरमधील शाळेत नऊ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार
वार्षिक समारंभाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व मुले आपापल्या घरी निघून गेली होती
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 09-01-2016 at 17:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape happened with nine years old schoolgirl in mumbai