एका आरोपीला अटक, दुसरा फरार
ठाण्यात कोपरी येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी येथील घोडबंदर रोडवरील ओवळा परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर दोन जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. मनिष ऊर्फ  माशाल गंगाराम शिंगे (२३) असे आरोपीचे नाव आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील वाघबीळ भागातील १६ वर्षीय मुलगी ओवळा येथे जात असताना आरोपी मनिष आणि त्याचा साथीदार धीरज कोल्हेकर याने तिला अडवले. तिचा मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर त्यांनी तेथील तलाव परिसरातील एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबतची तक्रार या मुलीने कासारवडवली पोलीस ठाण्यात केल्यावर पोलिसांनी आरोपी मनिषला अटक केली.

Story img Loader