घरकाम करणाऱ्या एका तरुणीला पॅन कार्ड बनवून देण्याच्या बहाण्याने हॉटेलात बोलावून बलात्कार करणाऱ्या व्यक्तीस सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी दुपारी सांताक्रूझ येथे ही घटना घडली.
पाली हिल येथील शिवसागर या इमारतीत १९ वर्षांची पूजा (नाव बदलेले) घरकाम करते. तिला पॅनकार्ड बनवायचे होते. आपल्या ओळखीच्या महिलेला तिने ही अडचण सांगितली. या महिलेने तिचा याच भागातील करिमुद्दिन खान (३६) याचा मोबाईल क्रमांक देऊन संपर्क करण्यास सांगितले. बुधवारी सकाळी पूजा कमरुद्दिनला सांताक्रूझ स्थानकाजवळ भेटली. पॅनकार्डसाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे या आरोपीने तिला सांगून जेम्स लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घरी आल्यावर पूजाने आपल्या घरमालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पॅनकार्ड देण्याच्या बहाण्याने घरकाम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार
घरकाम करणाऱ्या एका तरुणीला पॅन कार्ड बनवून देण्याच्या बहाण्याने हॉटेलात बोलावून बलात्कार करणाऱ्या व्यक्तीस सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी दुपारी सांताक्रूझ येथे ही घटना घडली.
First published on: 14-12-2012 at 03:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape on damsel