कल्याणमध्ये काटेमानिवली येथील एका तरूणीला पळवून नेऊन तिच्याशी जबरदस्तीने लग्न करून बलात्कार केल्याची घटना उघडकीला आली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या तरूणाला अटक केली आहे.
वरळी येथे राहणारा संतोष पाटील याचे तो काम करीत असलेल्या कल्याण पूर्वेतील काटेमानीवली येथे राहणाऱ्या तरूणीबरोबर एकतर्फी प्रेम होते. १९ नोव्हेंबर रोजी संतोष या पीडित मुलीच्या घराशेजारी आला होता. ही मुलगी घरातून कचरा टाकण्यासाठी बाहेर पडताच संतोषने तिला गाठले  व लग्न करण्याची गळ घातली. या तरूणीने नकार देताच संतोषने तिला मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली व तिला पळवून नेऊन तिच्याशी जबरदस्तीने लग्न करून बलात्कार केला.    

Story img Loader