सातारा येथून एका ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी ठाण्यात आलेल्या एका १५ वर्षीय मुलीवर तीन जणांनी सामूहीक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या त्रिकूटाला ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तसेच ज्या व्यक्तीला ती भेटण्यासाठी आली होती, त्याचा या प्रकरणात सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
गोपाळकृष्ण दासश्री (२७, रा. घाटकोपर), राजेंद्र भास्कर नायडू (२०, रा. गोवंडी) आणि विश्वकेशन लक्ष्मण बेन्डू (२५, रा. घाटकोपर), अशी त्रिकूटाची नावे असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. सातारा येथील वाई भागात यातील पिडीत १५ वर्षीय मुलगी राहते. डोंबिवली भागात राहणाऱ्या नितीन मसाळ या व्यक्तीसोबत तिची ओळख झाली होती. त्याने १६ जानेवारीला तिला फोन करून डोंबिवली येथे भेटण्यासाठी बोलाविले होते. त्यानुसार, १७ जानेवारीला ती एसटी बसने पुणे येथील स्वारगेट स्थानकात गेली व तेथून रेल्वेने रात्री ठाणे स्थानकात आली. मात्र, नितीनचा फोन लागत नसल्याने ती स्थानकात रडत बसली होती. याच संधीचा फायदा घेत गोपाळकृष्ण आणि राजेंद्र या दोघांनी तिला घरी नेले व तेथे गोपाळकृष्णने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर राजेंद्रने गोवंडी येथील घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा