ठाणे येथील साठेनगर भागात राहणाऱ्या एका चर्चच्या फादरने सरबतामधून गुंगीचे औषध देऊन एका तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून हा फादर फरारी झाला आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
लग्नाचे अमिष दाखवून या धर्मप्रचारकाने तिला फसविले होते तसेच मोबाइलद्वारे केलेले चित्रीकरण जगजाहीर करण्याची धमकी देऊन तो तिच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून बलात्कार करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बिजूमोन. के. एल असे या फादरचे नाव असून तो वागळे इस्टेट येथील साठेनगर भागात राहतो. सहा महिन्यांपुर्वी त्याने लोकमान्यनगर भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला घरी बोलविले होते. त्यावेळी त्याने सरबतामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याचे मोबाइलद्वारे चित्रिकरणही केले होते.
ते चित्रिकरण लोकांना दाखवून तुझी बदनामी करेन आणि या प्रकाराबाबत कुणाला सांगितले तर तुझ्या आईवडिलांना ठार मारेन, अशी धमकी त्याने तिला दिली होती.
त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून तो लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करीत होता. त्यामुळे दोनदा ती गरोदरही राहिली पण, त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले.
दरम्यान, या प्रकरणी पिडीत तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape on youngr crime against father
Show comments