घणसोली येथील घरोंदा येथे वास्तव्यास असलेल्या पाच वर्षीय बालिकेला फूस लावून अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
राहुल पाटेकर असे आरोपीचे नाव असून घणसोली पामबीच रस्त्यालगत शनिवारी रात्री उशिरा घटना घडली. घरासमोरच वास्तव्यास असलेल्या पाच वर्षांच्या बालिकेवर वर्दळ नसताना झुडपात अत्याचार करण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाला गस्तीवर असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखून अटक करण्यात आली. याप्रकरणी कोपरखरणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader