टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर बलात्कारप्रकरणी फरार असलेला मोहम्मद अश्फाक दाऊद शेख या पूर्वीही पोलिसांच्या जाळ्यात आला होता. छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे.
छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला चांदबाबू सत्तार शेख या तरुणाला अटक केली होती. चांदने या प्रकरणात अश्फाक शेख असल्याचे पोलिसांना सांगितले होते. अश्फाक हा मुंब्रा येथे राहतो. त्याच्या नावावरही चोरीच्या काही गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. पण माझा काही संबंध नाही, असे त्याने सांगितले. त्याच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन २२ ऑगस्टच्या दिवशी मुंब्रा येथे असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडले होते.

Story img Loader