वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागात सख्या भावाने लहान बहिणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी त्यास अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून तो तिच्यावर बलात्कार करीत होता, त्यामुळे ती सात महिन्यांची गरोदर राहिली आहे.
पीडित मुलगी १४ वर्षांची असून ती दहावीच्या वर्गात शिकत आहे. इंदिरानगर परिसरात ती आई-वडील, जुळी बहीण आणि १९ वर्षीय भाऊ यांच्यासोबत राहते. तिचे आई-वडील मोलमजूरीचे काम करतात. तसेच तिची बहीण त्यांच्यासोबत कामाला जाते तर भाऊ काहीच काम करीत नाही. मे २०१२ मध्ये तिचे आई-वडील आणि बहीण कामावर गेले होते. त्यावेळी ती घरात एकटी असताना भावाने तिच्यावर बलात्कार केला. तसेच या प्रकाराबाबत कोणालाही सांगू नये, यासाठी तिला मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतरही तो तिच्यावर बलात्कार करीत होता. दरम्यान, पोटात दुखू लागल्याने आई-वडिलांनी तिला उपचारांसाठी दवाखान्यात नेले, त्यावेळी ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी पथकाने तपास सुरू केला, त्यावेळी भावाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गौतम कांबळे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapist brother arrested in wagle street of thane
Show comments