स्वत:च्या मुलीवर गेल्या सहा वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या पित्यास कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे. झाकीर हबीब शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्या १७ वर्षीय मुलीने तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
कफ परेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मूर्तीनगर परिसरात झाकीर (४२) हा राहतो. तो खासगी टूरिस्ट कंपनीत वाहनचालक आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून चार आणि दुसऱ्या पत्नीपासून दोन मुले आहेत. त्याच्या १७ वर्षीय मुलीने मैत्रिणीच्या मदतीने गुरुवारी पोलीस ठाणे गाठले आणि बापाविरोधात तक्रार दिली. गेल्या सहा वर्षांपासून आपले वडील आपल्यावर बलात्कार करीत होते, अशी तक्रार तिने दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन खरात यांनी सांगितले. गुरुवारी दुपारी शेखला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून अद्याप त्याचा वैद्यकीय अहवाल मिळालेला नाही. या प्रकरणाची घरातील अन्य कुणाला माहिती होती का त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. पीडित मुलगी शेखच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा