बदलापूर येथील डॉन बॉस्को शाळेतील पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणारा क्लीनर संदीप केरवे (२६) याला रविवारी दुपारी कल्याणच्या विशेष न्यायालयात पोलिसांनी हजर केले. न्यायालयाने त्याला २३ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या आरोपीने अन्य कुणाशी असे कृत्य केले आहे का याची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी संदीपला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाला केली. मात्र न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडीत दिली. या घृणास्पद कृत्याबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संतप्त जमावाने काही बसची नासधूस केली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष उमेश तावडे यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Story img Loader