मुंबई : कफ परेड परिसरात समुद्रातील बोटीत दुर्मीळ वटवाघळाचा (टिकल्स बॅट) वावर दिसून आला. ‘टिकल्स बॅट’ दाट जंगलांमध्ये आढळते. मुंबईत याआधीही या वटवाघुळाची नोंद झाल्याची माहिती अभ्यासकांनी दिली.

‘टिकल्स बॅट’ समुद्रकिनारी आढळतात अथवा शिकार करतात असा कोणताही उल्लेख नाही. शिवाय वटवाघूळ हे मुख्यत: निशाचर आहे. पहाटेला ते दृष्टीस पडत नाहीत, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. दरम्यान, बोटीत आलेले वटवाघूळ हे सकाळी निदर्शनास आले आहे. प्रथमच ते त्याच्या वास्तव्यापासून दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच बोटीत आले. हे वटवाघुळ मुंबईत निदर्शनास आले. या वटवाघळाचा अधिवास राष्ट्रीय उद्यान परिसरात अपेक्षित आहे. मात्र, कफ परेड परिसरात ते दिसणे शक्य नाही. तेथे कांदळवन क्षेत्रही नाही. जोरदार वाऱ्यांमुळे ते भरकटल्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली.

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Elderly man murdered
Crime News : लग्नाचे आश्वासन, सोन्याचे दागिने अन्… ७२ वर्षांच्या वृद्धाबरोबर रायगडमध्ये काय घडले? मुंबईतील जोडप्याला हत्येच्या आरोपाखाली अटक
MHADA issues notices to expedite redevelopment of old cessed buildings Mumbai
जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास; ४१ मालकांकडून प्रस्ताव सादर
Robot DJ concert at Techfest DJ Robot in Japan Mumbai print news
‘टेकफेस्ट’मध्ये रोबोद्वारे ‘डीजे कॉन्सर्ट’; जपानमधील ‘डीजे रोबोट’ प्रथमच भारतीयांच्या भेटीला
Two impersonator municipal officials arrested in Mulund Mumbai news
मुलुंडमध्ये दोन तोतया पालिका अधिकाऱ्यांना अटक

हेही वाचा >>>Marathi vs Marwadi Conflict : “मराठी माणसाच्या दुश्मनांच्या हातात मुंबई सोपवण्याची…” मराठी-मारवाडी वादावर संजय राऊतांकडून भाजपा लक्ष्य

टिकल्सची कूळकथा

वेस्पर कुळातील एक प्रजाती आहे. बांगलादेश, कंबोडिया शक्यतो चीन, भारत, म्यानमार, थायलंड आणि श्रीलंकेमध्ये टिकल्स वटवाघूळ आढळतात. यांचा रंग सामान्यत: राखाडी पिवळा ते चमकदार सोनेरी तपकिरी असतो. तर आतील बाजूला राखाडी फिकट असते. पंखसदृश्य पडदा काळ्या रंगाचा असतो. पंख मध्यम रुंद असतात. शेपटी टोकाला पडद्यामध्ये बंद केलेली असते. नराच्या तुलनेत मादी आकाराने मोठी असते.

टिकल्स वटवाघूळ भारताच्या अनेक भागात आढळतात, परंतु ते क्वचितच दिसतात. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यालगत त्याचे दर्शन घडले याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. – रोहित चक्रवर्ती, वटवाघूळ प्रकल्प व्यवस्थापक, नेचर कॉन्झर्व्हेशन फाउंडेशन

Story img Loader