देशाच्या ‘जर्नल ऑफ केस रिपोर्ट’मध्ये आजाराची नोंद

मूत्रपिंडात कर्करोगाची गाठ असलेले, याचवेळी फुप्फुसांमध्ये हवा जमा झालेली आणि शरीरावरील केसांवर कर्करोगाच्या गाठी तयार होत असलेल्या एचबीडी (बर्ट हॉग डुबे) या दुर्मीळ आजारावर कामा रुग्णालयात उपचार देण्यात आले. हा आजार अतिशय दुर्मीळ असून काही दिवसांपूर्वी या आजाराचा तपशील भारताच्या दुर्मीळ वैद्यकीय आजारांची माहिती देणाऱ्या जर्नल ऑफ केस रिपोर्टने स्वीकारले असल्याचे कामा रुग्णालयातील कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप निकम यांनी सांगितले.

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
17 bogus doctors found in a year annual review meeting of the District Health Department concluded thane news
बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आव्हान; वर्षभरात १७ बोगस डॉक्टर आढळले, जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक संपन्न
patients of gastro Sangli, gastro, Drainage water ,
सांगलीत गॅस्ट्रो साथीचे ५० रुग्ण आढळले, पाणी पिण्याच्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी शिरले
enior citizen declared brain dead and his liver donation saved persons life
अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्ण मृत्यूनंतर दुसऱ्याला जीवदान देऊन गेला!
hair loss reasons loksatta news
टक्कल, केसगळतीचे कारण काय? चेन्नई, दिल्लीतील पथक शेगावात

गेल्या वर्षी कामा रुग्णालयात कर्करोग विभागात एक ३० वर्षीय महिला मूत्रपिंडाच्या कर्करोगावर उपचार घेत होती. यादरम्यान तपासणीमध्ये रुग्णाच्या फुप्फुसांमध्ये हवेच्या गाठी तयार होत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. रुग्णाच्या शरीरावरील केसांमध्येही छोटय़ा छोटय़ा कर्करोगाच्या गाठी तयार होत होत्या. सर्वसाधारण कर्करुग्णांमध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसत नाहीत. तपासणी दरम्यान या आजाराचा प्रकार वेगळा असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.  याबाबत अधिक माहिती मिळविल्यानंतर हा दुर्मीळ एचबीडी नामक सिंड्रोम असल्याचे पाहणीत आले. हा आजार जगभरात आतापर्यंत १५ ते २० रुग्णांना झाला असून आपल्या देशात या आजारावर उपचार पद्धत उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टरांनी पुढाकार घेत युरोपातील एका तज्ज्ञ डॉक्टरांना या आजाराबाबतची सर्व माहिती मेलद्वारे पोहोचवली होती. या आजारासाठी युरोपातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. अशा दुर्मीळ आजारांवर देशात उपचार पद्धती नसल्यामुळे डॉ. दिलीप निकम यांनी या आजाराचा तपशील जर्नल ऑफ केस रिपोर्टमध्ये दिला. मुळात हा आजार पिढय़ानपिढय़ा असल्यामुळे रुग्णांमधील गुणसूत्राची तपासणी करण्याऐवजी वैद्यकीय पद्धतीने आजाराचे निदान करण्यात डॉक्टरांना यश आले. हा आजार पिढीजात असल्यामुळे कुटुंबातील अनेकांमध्ये या आजाराची लागण होऊ शकते. यासाठी कुटुंबातील सदस्यांच्या तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र आपल्याकडे कर्करोगाकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित असल्यामुळे हे सदस्य तपासणीसाठी येण्यास तयार झाले नाहीत, याबाबत डॉ. निकम यांनी खंत व्यक्त केली.

कर्करोगाचा हा प्रकार अत्यंत दुर्मीळ असून जर्नल ऑफ केस अहवालाने या आजाराचा अहवाल स्वीकारला असून लवकरच या आजाराचा अभ्यासपूर्ण तपशील प्रसारित करण्यात येणार आहे. मात्र आपल्या देशात अशा दुर्मीळ आजाराविषयी उपचार करण्याचे उपाय नाहीत याची खंत आहे.

– डॉ. दिलीप निकम, कर्करोग विभागप्रमुख, कामा रुग्णालय

 

 

Story img Loader