मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालयातील वैद्यकीय चमूने गुंतागुंतीची, दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी करत एका महिलेला जीवदान दिले. वैद्यकीय परिभाषेत ‘साइटस इनवर्सस टोटलिस’ म्हणजेच शरीरात सामान्यांच्या तुलनेत विरुद्ध अवयवरचना असलेल्या या महिलेचे पित्ताशय उजव्याऐवजी डाव्या बाजूला होते. आव्हानात्मक अशी शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे (लेप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी) करत या महिलेचे पित्ताशय काढण्यात आले. अतिशय कुशलतेने ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तसेच आठ दिवसांच्या वैद्यकीय देखरेखीअंती महिलेला घरी सोडण्यात आले. या महिलेची प्रकृती आता ठणठणीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> टीआरपी घोटाळा : खटला मागे घेण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जावर भूमिका स्पष्ट करा, न्यायालयाची मूळ तक्रारदाराला नोटीस

सांताक्रूझ पूर्व येथील व्ही. एन. देसाई महानगरपालिका रूग्णालयात १५ दिवसांपूर्वी ३५ वर्षीय महिला दाखल झाली. स्थूल प्रकृतीमान असलेली ही महिला पोटदुखीने त्रस्त होती. पित्ताशयाच्या पिशवीला आलेली सूज आणि पित्ताशयामध्ये तयार झालेल्या असंख्य खड्यांमुळे महिलेला पोटदुखी होत असल्याचे नियमित वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. वैद्यकीय तपासणी करत असताना या महिलेच्या शरीरात एरवीपेक्षा विरुद्ध असलेली दुर्मीळ अशी अवयवरचना असल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय परिभाषेत ‘साइटस इनवर्सस टोटलिस’ असल्यास अशा स्थितीत सामान्य मानवी शारीरिक रचनेच्या अगदी विरूद्ध बाजूला व्यक्तीचे अवयव असतात. पित्ताशयाला आलेली सूज आणि असंख्य खडे यामुळे या महिलेवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. मात्र, ‘साइटस इनवर्सस टोटलिस’ मुळे महिलेवर शस्त्रक्रिया करणे जोखमीचे आणि गुंतागुंतीचे होते. त्यातच, स्थूलता आणि फुफ्फुसाची नाजूक स्थिती यामुळे डॉक्टरांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

हेही वाचा >>> आयसिस प्रकरणात एनआयएकडून ४ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विदया ठाकूर, व्ही. एन. देसाई महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरबंससिंग बावा यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर दीक्षित आणि त्यांचे सहकारी डॉ. रितू नंदनीकर, डॉ. राहुल महेश्वरी, भूलतज्ज्ञ डॉ. किरण, डॉ. प्रियांका जगावकर यांच्या चमूने दुर्बिणीच्या सहाय्याने पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया अतिशय कुशलतेने केली. वैद्यकीय देखरेखीनंतर प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने या महिलेला आठ दिवसांनी घरी जाण्याची अनुमती देण्यात आली. तसेच, ७ दिवसांनी टाके काढण्यात आले. या महिलेची प्रकृती आता ठणठणीत असल्याचे डॉ. सुधीर दीक्षित यांनी सांगितले.

‘साइटस इनवर्सस टोटलिस’ रचना कशी असते

पोटदुखीने त्रस्त असलेली ही महिला ‘साइटस इनवर्सस टोटलिस’ या शरीर रचनेत मोडणारी आहे. तिचे पोटामधील सर्व अवयव हे डाव्या दिशेला होते. हृदय उजव्या बाजूला, यकृत उजव्याऐवजी डाव्या बाजूला, आतडे उजव्याऐवजी डाव्या बाजूला होते. तसेच, पित्ताशय डावीकडे होते. जन्मापासून असणारी आणि क्वचित आढळणारी ही शारीरिक अवयव स्थिती आहे. त्याचे प्रमाण साधारणतः ०.०१ टक्के इतके दुर्मीळ आढळते.