मुंबईः पहाटे दोनच्या सुमारास पायात प्रचंड दुखत असल्याने २९ वर्षांची सुमारे ११० किलो वजनाची महिला रुग्णालयात आली. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या तसेच टुडी इको काढला तेव्हा ह्रदयात रक्तगुठळ्या ब्लड क्लाट असल्याचे दिसून आले तसेच दोन्ही पायातील रक्तवाहिन्यांमध्येही ब्लड क्लाट  होते. त्याचप्रमाणे मुत्रपिडाचाही त्रास असल्याचे दिसून आले.मुंबईतील होलीफॅमिली हॉस्पिटलमधील ह्रदयविकार शल्यचिकित्सक डॉ अमित कराड यांनी महिलेच्या हृदयातील रक्ताची गुठळी काढून टाकण्याची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. ज्यामुळे प्राणघातक स्ट्रोकपासून ती वाचली. गुठळी, असामान्यपणे दोन्ही पायातील रक्त वाहिन्यात दूर गेली होती आणि अनेक अवयवांमध्ये रक्त प्रवाह अवरोधित केला होता परिणामी ही शस्त्रक्रिया एक आव्हान बनले होते.

११० किलो वजन आणि अनेक अवयवांवर परिणाम झाल्यामुळे होली फॅमिली हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दोन शस्त्रक्रिया एकत्र करून एक जीव वाचवणारी शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी निर्णय घेतला.ही गुठळी ‘लेफ्ट व्हेंट्रिक्युलर थ्रोम्बस’ म्हणून ओळखली जाते. गंभीर गोष्ट म्हणजे रुग्णांचे हृदय फक्त २० टक्के कार्यरत होते. ही शस्त्रक्रिया करणारे डॉ. अमित कराड, कार्डिओथोरॅसिक सर्जन म्हणाले, ही गुठळी १० सेमी लांब व तीन सेमी जाडीची होती. ती मेंदूकडे न जाता खाली का गेली हे आम्हाला पूर्णपणे समजलेलं नाही, पण बहुतेक वेळा अशा गाठी मेंदूकडे जातात. डॉ. यश लोखंडवाला, कार्डिओलॉजिस्ट म्हणाले, ती खरंच नशिबवान होती की मेंदूकडे एखादा तुकडा गेला नाही अन्यथा ती कोमात गेली असती किंवा पक्षाघात झालेला असता.

रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी, डॉक्टरांनी आधी तिच्या हृदयातील गाठ काढली व हृदयाचे कार्य सामान्य केले. तिच्या वजनामुळे आणि इतर अवयवांच्या धोक्यामुळे पोट उघडणे टाळण्यात आले. त्याऐवजी छातीतील मोठ्या धमनीतून दोन्ही पायांतील धमनींना कृत्रिम मार्गाने जोडले, जेणेकरून अडथळित रक्तप्रवाह बाजूला काढता आला. शेवटी, डॉक्टरांनी तिच्या दोन्ही पायांतील मोठ्या गाठी काढल्या आणि रक्तप्रवाह पूर्ववत केला. या महिलेच्या हृदयात मोठ्या प्रमाणात रक्ताची गुठळी फुटल्याने संभाव्य प्राणघातक स्ट्रोकमधून ती थोडक्यात बचावली. तिच्या मेंदूपर्यंत पोहोचण्या ऐवजी, गुठळी खालच्या दिशेने गेली, ज्यामुळे तिचे पाय, प्लीहा, मूत्रपिंड आणि गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा रोखला गेला. ११० किलो वजनाच्या व अनेक अवयवांतील रक्तपुरवठ्यावर परिणाम झालेल्या या महिलेला धोका मोठा होता.डॉ अमित कराड यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून या शस्त्रक्रियेत डॉ यश लोखंडवाला, डॉ कुणाल शिनकर, डॉ जय जडवानी, डॉ सुयश व डॉ शहा यांची मोलाची मदत झाल्याचे डॉ कराड म्हणाले. सामान्यपणे अशा गुठळ्या मेंदूऐवजी शरीराच्या खालच्या भागात सरकताना आपल्याला सहसा दिसत नाहीत असेही त्यांनी सांगितले.

हृदयरोगतज्ञ डॉ यश लोखंडवाला म्हणाले अशी गुठळी अनेकदा मेंदूकडे जाते परिणामी रुग्ण कोमाता जातो किंवा अर्धांगवायू होऊ शकतो. ही महिला खरोखरच भाग्यवान होती की असे घडले नाही. शल्यचिकित्सकांनी प्रथम तिचे हृदय उघडले व मुख्य पंपिंग चेंबर मधून गुठळी काढून टाकली, नंतर कार्य पुनर्संचयित करण्यासाठी हृदयाच्या भिंतीची दुरुस्ती केली. तिचे वजन आणि अवयवांच्या स्थितीशी संबंधित उच्च जोखमीमुळे त्यांनी ओटीपोटाची शस्त्रक्रिया टाळली. त्या ऐवजी, त्यांनी छातीतील सर्वात मोठ्या धमनीपासून दोन्ही पायांच्या धमन्यां पर्यंत एक कृत्रिम वाहिनी जोडून, रक्त प्रवाह पुनर्संचयित करून बायपासचा शोध लावला.

डॉ अमित कराड यांनी आतापर्यंत सहा हजाराहून अधिक ह्रदयशस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच साठहून अधिक ह्रदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत. याशिवाय सुमारे तीस कृत्रीम ह्रदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या असून कॅनडातील टोरांटो जनरल हॉस्पिटल (जगातील दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय व हाय व्हॉल्यूम हार्ट ट्रान्सप्लांट सेंटर) येथे प्रगत हार्ट फेल्युअर आणि ट्रान्सप्लांट फेलोशिप पूर्ण केल्यानंतर ठरवून भारतात परत आल्याचे सूत्रांनी सांगितले.