मुंबई : दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी किनाऱ्यावर दुर्मिळ अशा पिवळ्या पोटाच्या सापाचा (यल्लो बेलीड सी स्नेक) वावर असल्याचे निदर्शनास आले असून विशेषत: दक्षिण आफ्रिका आणि नामिबियाच्या किनारपट्टीवर हा साप आढळतो. दरम्यान, अभ्यासकांच्या मते हा साप मुंबईत प्रथमच दिसला आहे.

पिवळ्या पोटाच्या सापाचे वास्तव्य प्रामुख्याने खोल समुद्रात असते. त्याचे संपूर्ण जीवनचक्र समुद्रातच चालते. आजारी, जखमी किंवा किनाऱ्यावर वाहून आल्यास तो दृष्टीस पडतो अन्यथा हा साप सहसा दिसत नाही. पिवळ्या पोटाचा साप गडद तपकिरी, काळा, उजळ पिवळा किंवा फिकट पिवळ्या रंगाचा असतो. त्याच्या शरीराचा खालचा भाग जास्त गडद असतो, तर कधी पाठीवर अरूंद काळ्या पट्ट्या असतात. एका सर्वेक्षणाच्या अहवालातील माहितीनुसार हा साप ८७ टक्के आयुष्य पाण्याखाली घालवतो. मात्र अनेकदा तो मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतो. हा साप १० ते ४५ इंच लांबीचा, तर पूर्व पॅसिफिकमध्ये दिसणारे बहुतेक साप १८ ते २५ इंच लांबीचे असतात. याचे प्रमुख अन्न हे मासे आहे.दरम्यान, दोन दिवसापूर्वी ‘मरिन लाईफ ऑफ मुंबई’चे प्रदीप पाताडे यांना पिवळ्या पोटाचा साप गिरगाव चौपाटीवर आढळला. मुबंईच्या समुद्रकिनारपट्टीवर हा साप पहिल्यांदाच दिसला असून याआधी याच्या कोणत्याही नोंदी मुंबईत नाहीत.

Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Dhirendrakrishna Shastri makes unscientific claims promote superstition under guise of spirituality
धीरेंद्रकृष्ण यांच्या कार्यक्रमास अंनिसचा विरोध, अंधश्रध्देस खतपाणी घालणाऱ्यांना परवानगी दिल्याबद्दल नाराजी
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
Leopard's Viral Video
‘नशीब चांगलं असलं की मृत्यूही मागे फिरतो…’ श्वानावर बिबट्याचा क्रूर हल्ला.. पण, पुढे जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप
इयन बोथम आणि मर्व्ह ह्यूज
मैदानावरच्या हाडवैरीने वाचवला मगरींच्या तावडीतून जीव; इयन बोथम यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

हेही वाचा…आदिवासी भागातील आरोग्य विभागाचे डॉक्टर पाच महिने वेतनाविना

पिवळ्या पोटाच्या सापाचे वास्तव्य प्रामुख्याने खोल समुद्रात असते. त्याचे संपूर्ण जीवनचक्र समुद्रातच चालते. आजारी, जखमी किंवा किनाऱ्यावर वाहून आल्यास तो दृष्टीस पडतो.

हेही वाचा…आचारसंहितेआधी म्हाडा सोडत अडचणीची, अर्ज भरण्यासाठी केवळ २६ दिवसांचा कालावधी

भारतातील किनारपट्टीवर हा साप दिसणे फारच दुर्मिळ आहे. हा साप प्रामुख्याने खोल समुद्रात राहतो. तो किनारपट्टीवर दिसत नाही. तसेच तो मुंबईतील किनारपट्टीवर दिसला ही आश्चर्याची बाब आहे. जाळ्यात अडकल्यामुळे भरकटून तो येथे आल्याची शक्यता असू शकते. पाऊस किंवा वादळी वारे यामुळे हा साप इकडे येण्याची शक्यता नाही. – चेतन राव, भारतातील सागरी सापांवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ