Ratan Tata : काही दिवसांपूर्वीच रतन टाटा ( Ratan Tata ) यांनी त्यांचे लहान भाऊ जिमी टाटा यांच्यासह असलेला एक फोटो शेअर केला होता. हा फोटो रतन टाटा आणि जिमी टाटा यांच्या बालपणीचा फोटो आहे. ‘एकमेकांबरोबरचे ते दिवस खूप आनंद देऊन गेले’ अशी पोस्ट रतन टाटा यांनी केली होती. १९४५ मधला या दोघांचा हा फोटो चर्चेत आला होता. हेच जिमी टाटा आज रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहचले. वटवृक्षासारखी मोठ्या भावाची सावली गमावल्याचं दुःख त्यांच्या मनात आणि चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. पाणवलेल्या डोळ्यांनी त्यांनी भावाला अखेरचा निरोप दिला.

रतन टाटांना अखेरचा निरोप

रतन टाटा ( Ratan Tata ) यांना आज अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले जिमी टाटा हे वरळीतील स्मशानभूमीत आले. त्यांनी रतन टाटांचं पार्थिव डोळे भरुन पाहिलं, त्यानंतर त्यांचे डोळे पाणावले. त्यांचा चेहरा आठवणींत हरवला. आपल्या सावलीसारख्या मोठ्या भावाला गमावल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावरही दाटून आलं. रतन टाटा यांची प्राणज्योत बुधवारी रात्री मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात मालवली. आज वरळीतल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
Natasa Stankovic reacts On Divorce From Hardik Pandya
घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…

हे पण वाचा- Video: रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेतल्यावर तरुणी हमसून हमसून रडली, पाहा भावुक व्हिडीओ

जिमी टाटा कोण आहेत?

जिम टाटा हे रतन टाटा ( Ratan Tata ) यांचे धाकटे बंधू आहेत. रतन टाटा यांच्यापेक्षा ते दोन वर्षांनी लहान आहेत. मुंबईतल्या कुलाबा भागात असलेल्या एका डबल बेडरुमच्या फ्लॅटमध्ये ते राहतात. रतन टाटा यांचे बंधू जिमी टाटा यांनीही लग्न केलेलं नाही. मात्र ते कधीही चर्चेत राहिले नाहीत. एवढंच काय त्यांच्याकडे साधा मोबाइल किंवा टीव्हीही नाही. जिमी टाटा हे टाटा समूहाच्या विश्वस्त मंडळात विश्वस्त आहेत. तसंच अनेक कंपन्यांच्या बोर्ड मेंबर्सच्या यादीतही त्यांचं नाव आहे. जिमी टाटा यांना आजही कुठलीही माहिती ही वर्तमानपत्रांद्वारेच मिळते.

हर्ष गोयंकांनी जिमी टाटांबद्दल काय म्हटलं होतं?

काही वर्षांपूर्वी हर्ष गोयंका यांनी जिमी टाटांबाबत एक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर रतन टाटांचे बंधू जिमी टाटा यांच्याबाबत लोकांना समजलं होतं. हर्ष गोयंकानी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की जिमी टाटा हे कुलाबा येथील एका टू बीएचके घरात राहतात. त्यांना व्यवसायात फारशी रुची नाही. ते खूप चांगल्या पद्धतीने स्क्वॅश खेळतात. मला त्यांनी अनेकदा हरवलं आहे. टाटा ग्रुप प्रमाणेच जिमी टाटा हे कायम कुठल्याही चर्चेपासून दूर राहतात.

जिमी टाटा हे रतन टाटांचे भाऊ आहेत तर नोएल टाटा हे रतन टाटांचे सावत्र बंधू आहेत. रतन टाटा यांच्या खासगी आयुष्याबाबत लोकांना खूपच कमी माहिती होती. काही दिवसांपूर्वी जिमी टाटा यांच्यासह एक फोटो रतन टाटांनी पोस्ट केला होता. तो फोटो १९४५ चा होता. त्यात जिमी टाटा तसंच त्यांचा पाळीव कुत्रा दिसत होता. ते खूप आनंदाचे दिवस होते, अशी पोस्ट रतन टाटांनी केली होती.