Industrialist Ratan Tata Hospitalised in Breach Candy Hospital : प्रसिद्ध उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन नवल टाटा (८६) यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब घसरल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार चालू असल्याच्या बातम्या वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, “माझी प्रकृती गंभीर नाही”, असं खुद्ध रतन टाटांनीच स्पष्ट केलं आहे. “नेहमीच्या आरोग्य तपासण्यांसाठी मी रुग्णालयात दाखल झालो आहे”. असंही टाटा यांनी त्यांच्या एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

टाटा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “माझ्या प्रकृतीबाबत पसरत असलेल्या अफवा माझ्या कानावर आल्या आहेत. हे सर्व दावे निराधार आहेत, असं मी सर्वांना सांगू इच्छितो. वाढत्या वयोमानामुळे नियमित आरोग्य तपासण्यांसाठी मी रुग्णालयात दाखल झालो आहे. चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी बरा आहे. प्रसारमाध्यमं व समाजमाध्यमांवरील चुकीच्या माहितीपासून दूर रहा आणि तुम्हीही या बातम्या पसरवू नका.

TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Nawab Malik Son in Law Accident
Sameer Khan : नवाब मलिक यांचा जावई कार अपघातात गंभीर जखमी, समीर खान आणि निलोफर यांच्या थारचा मुंबईत अपघात
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
Israeli PM Netanyahu at UN Shows India map as Blessing
Israeli PM Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंनी UN मध्ये भारताचा नकाशा दाखवला; मध्य-पूर्वेतील संघर्षावर मोठं वक्तव्य
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Godman Rajneesh was a philosophy lecturer before founding his spiritual movement in Pune.
Osho : “ओशो आश्रमात माझ्यावर तीन वर्षांत ५० वेळा बलात्कार, मला चाईल्ड सेक्स स्लेव्ह…”; महिलेने सांगितली आपबिती
Raj Thackeray in Pune for Marathi Sahitya Parishad
Raj Thackeray in Pune : “महाराष्ट्रात असे लोक आहेत, ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत”, राज ठाकरेंचा टोला

२८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत जन्मलेले रतन टाटा उद्योगांसह सामाजिक क्षेत्रातही काम करत आहेत. रतन टाटा हे टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू आहेत. १९९० ते २०१२ पर्यंत २२ वर्षे ते टाटा समुहाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान, त्यांनी टाटा समुहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला आहे. रतन टाटा यांनी अनेक वर्षे टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं आहे.

हे ही वाचा >> …ज्यांनी टाटाला बनवले विश्वासाचा ब्रँड

एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरच ते त्यांच्या परोपकार अन् दानधर्मासाठीही ओळखले जातात. रतन टाटा यांचा जन्म १९३७ मध्ये मुंबईत नवल टाटा आणि सुनी टाटा यांच्या पोटी झाला. रतन टाटा १० वर्षांचे असताना त्यांचे पालक विभक्त झाले, त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केले. रतन टाटा यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून घेतले. यानंतर त्यांनी बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल, न्यूयॉर्कमधून १९५५ मध्ये डिप्लोमा केला. रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी कधीही लग्न केले नाही.

हे ही वाचा >> रतन टाटांची एकूण संपत्ती आहे तरी किती?

सेवाकार्यात अग्रेसर

केवळ उद्योगच नव्हे तर रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही जगभर प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला एकूण २८ दशलक्ष डॉलर्स दान केले. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय विद्यार्थ्यांना मदत होते. याबरोबरच हार्वर्ड बिझनेस स्कूलने विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ५० दशलक्ष डॉलर्स दान केले होते. याशिवाय त्यांनी २०१४ मध्ये IIT बॉम्बेमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी ९५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. याबरोबरच दरवर्षी ते आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कार्यात खर्च करतात.