राज्याचे विद्यमान माहिती आयुक्त आणि माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांची बदली झाल्यानंतरही ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) राहत असताना त्या सदनिकेची वीजजोडणी स्वतंत्र न ठेवता ती सामायिक मीटरला जोडली गेल्यामुळे या घराच्या वीजवापर तसेच गॅस आणि इतर सरकारी सुविधांचा खर्च एमएमआरडीएने सोसला, असा गंभीर आरोप एमएमआरडीएचे माजी आयुक्त राहुल अस्थाना यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
‘एमएमआरडीए’चे आयुक्त म्हणून गायकवाड यांनी हाती घेतलेले अनेक प्रकल्प हे अस्थाना यांच्या कालावधीत रद्द करण्यात आले. तेव्हा त्यांच्यात शीतयुद्ध सुरू होऊन गायकवाड यांचे ‘एमएमआरडीए’च्या इमारतीमधील वास्तव्य, तेथील गॅस-विजेचे पैसे देण्यावरून वाद निर्माण झाला. या प्रकरणी गायकवाड यांनी पाठवलेले पत्र राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी अस्थाना यांच्याकडे पाठवले.
अस्थाना यांनी २८ फेब्रुवारी २०१३ या सेवेतील शेवटच्या दिवशी मुख्य सचिवांना या पत्राचे उत्तर पाठवले. त्यात हे आरोप करण्यात आले आहेत.
एमएमआरडीएच्या पैशांवर गायकवाड यांचा ‘घरसंसार’!
राज्याचे विद्यमान माहिती आयुक्त आणि माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांची बदली झाल्यानंतरही ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-08-2013 at 03:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnakar gaikwad family depend on mmrda money