चित्रपट निर्माते अली मोरानी यांच्या घरावर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याने केलेला गोळीबार हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. परंतु खबरदारी म्हणून ज्यांना रवी पुजारीने धमकी दिली त्या सर्वाना पोलीस संरक्षण पुरविण्यात आले आहे.
सिनेयुग कंपनीचे मालक आणि चित्रपट निर्माते अली मोरानी यांच्या जुहू येथील बंगल्यावर रवी पुजारी याने शनिवारी रात्री गोळीबार केला होता. सुरवातीला हा गोळीबार झाला हे कुणालाच माहीत नव्हते. नंतर खुद्द रवी पुजारीने माध्यमांना तसेच मोरानी यांच्या मुलीला फोन करून गोळीबार झाल्याची माहिती दिली. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी रवी पुजारी असे उद्योग करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पण खबरदारी म्हणून गेल्या तीन वर्षांत ज्यांना रवी पुजारीने धमक्या दिल्या त्या सर्वाना पोलीस संरक्षण दिले असल्याचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) सदानंद दाते यांनी सांगितले. धमकी मिळालेल्या एकूण सात जणांना असे संरक्षण दिले असल्याचे ते म्हणाले.
‘हा तर रवी पुजारीचा स्टंट’
चित्रपट निर्माते अली मोरानी यांच्या घरावर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याने केलेला गोळीबार हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-08-2014 at 05:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi pujari attack stunt for fame