भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या नावावरुन राजन यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या वैयक्तिक ई-मेल आयडीवर धमकी देण्यात आली आहे.  मुंबई पोलीसांच्या माहितीनूसार, isis583847@gmail.com या मेल आयडीवरून राजन यांना धमकीचा मेल पाठविण्यात आला आहे. मला तुम्हाला मारण्यासाठी कोणीतरी पैसे दिले आहेत. मात्र, तुम्ही त्यापेक्षा जास्त पैसे द्यायला तयार असाल तर, आपण याबाबत विचार करू शकतो, असा मजकूर या ई-मेलमध्ये लिहण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला राजन यांना अशाप्रकारची धमकी मिळाल्याच्या वृत्ताला मुंबई पोलीसांनी दुजोरा दिला आहे. मात्र, सायबर सेलचे अधिकारी सध्या या प्रकरणाचा तपास करत असून हे कृत्य निव्वळ खोडसाळपणा असण्याचीही शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन सेलने या ई-मेल आयडीच्या माहितीसाठी अमेरिकेत गूगलकडूनही मदत मागितली आहे.

Story img Loader