मुंबई :रिझर्व बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा दूरध्वनी आला असून हा दूरध्वनी रिझर्व बँकेच्या ग्राहक महत क्रमांकावर आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला ‘लश्कर – ए – तैयब’चा विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचा दावा केला. हा दूरध्वनी शनिवार सकाळी सुमारे १० च्या आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपण लश्कर-ए-तैयबचा सीईओ आहे, बँक बंद करा. मोटरगाडी धडक देणार आहे , अशीही धमकी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन रिझर्व बँकेच्या सुरक्षा रक्षकाने माता रामाबाई मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, हा एक खोडसाळपणा असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी याप्रकारणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा…धारावी प्रकल्प रद्द करणार! काँग्रेसचा ‘मुंबईनामा’ जाहीर

यावर्षी विमानतळावर अनेक धमक्याचे संदेश आले होते. त्याप्रकारणी २० गुन्हे दाखल आहेत. गेल्यावर्षीही अफवांचे सुमारे १०० दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते. यावर्षी जुलै महिन्यापर्यंत ३५ दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यात बॉम्ब असल्याचे ट्वीट करणाऱ्याला नुकतीच मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. हे ट्वीट १३ जुलै रोजी करण्यात आले होते. दरम्यान, सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेण्यात आली होती. याप्रकरणी विरल आसरा या तरूणाला अटक करण्यात आली होती. तो खासगी कंपनीत कामाला आहे. आरोपी आयटी इंजिनीयर होता. तर एका व्यक्तीने १३ मे रोजी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून असलम अली कराची पाकिस्तानमधून ३५० किलो आरडीएक्स घेऊन मुंबईत आला आहे. तो महालक्ष्मी, विमानतळ आणि इतर रेल्वे स्थानाकांवर आरडीएक्स ठेवणार असल्याचे दूरध्वनी करणाऱ्याने सांगितले. दूरध्वनीवरून देण्यात आलेली ही माहिती खोटी असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi received threatening phone call from lashkar e taiba mumbai print news sud 02