रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मुंबईस्थित सहकारी बँक रायगड सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती बिघडत असल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. या निर्बंधांमुळे ठेवीदारांना खात्यातून फक्त १५ हजार रुपये काढता येणार आहेत. सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू असणार आहेत.

आरबीआयने निवेदनात सांगितलं आहे की “ठेवीदारांना बचत खातं, चालू खातं किंवा इतर कोणत्याही खात्यातून एकूण जमा रकमेतील १५ हजारांपेक्षा कमी रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते”.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले
loksatta readers feedback
लोकमानस: संशय आणि असुरक्षिततेचा परिणाम

दरम्यान आरबीआयने रायगड सहकारी बँकेवर फक्त निर्बंध लावण्यात आले असून त्यांचा बँकिंग परवाना रद्द केलेला नाही असंही स्पष्ट केलं आहे. तसंच जोपर्यंत बँकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत बँक निर्बंधांसह दैनंदिन कामकाज करत राहणार असल्याचंही सांगितलं आहे. परिस्थितीनुसार निर्देशांमध्ये बदल करण्यासंबंधी विचार केले जाऊ शकतात अशी सूचनाही आरबीआयने दिली आहे.

दरम्यान दुसऱ्या एका निवेदनात आरबीआयने नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीडमधील श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सहा लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती दिली आहे.