लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: गेली आठ वर्षे फरार असलेल्या एका सराईत आरोपीला आरसीएफ पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. शरीफ शेख (२९) असे या आरोपीचे नाव असून तो मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंड परिसरात वास्तव्यास होता.

husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

आरसीएफ पोलिसांनी २०१६ मधील एका दरोड्याच्या गुन्ह्यात या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र हा आरोपी पोलिसांना सापडत नव्हता. हा आरोपी शुक्रवारी चेंबूरमधील रामटेकडी परिसरात येणार असल्याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा… सीआयएसएफ जवानाच्या रायफलचे मॅगझीन गायब

मात्र पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला मानखुर्द परिसरात अटक केली. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांत १० गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.