घरांच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या रेडीरेकनरच्या (वार्षिक बाजार मूल्य) दरामध्ये राज्य सरकारने एक एप्रिलपासून वाढ केली आहे. मुंबईमध्ये सरासरी सात टक्के तर पुण्यामध्ये सरासरी सर्वाधिक ११ टक्क्यांनी दरात वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी ही वाढ आठ टक्के, नगर परिषद क्षेत्रासाठी सात टक्के आणि राज्याची एकूण सरासरी वाढ सात टक्के इतकी असणार आहे. शहरातील भागानुसारचे टक्के शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे.
नाशिकमध्ये सात टक्के, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये सहा टक्क्याने रेडीरेकनरच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. मागील पाच ते सहा वर्षांत रेडीरेकनरच्या दरात मोठी वाढ झाली होती. यावर्षी मंदी आणि दुष्काळी परिस्थितीचा विचार करून तुलनेत कमी वाढ करण्यात आली असल्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत जाहीर केले.
रेडीरेकनरच्या दरात वाढ; मुंबईत ७, पुण्यात सर्वाधिक ११ टक्के वाढ
राज्याची एकूण सरासरी वाढ सात टक्के इतकी असणार आहे
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 31-03-2016 at 18:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ready reckoner rates revised from 1 april