महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण म्हणजेच महारेराकडे नोंदणी असल्याशिवाय इस्टेट एजंट घर खरेदी-विक्रीचा व्यवसाय करू शकत नाही, अशी रेरा कायद्यातच तरतूद आहे. परंतु महारेराकडे नोंदणीकृत नसलेले असंख्य एजंट विविध विकासकांचे मार्केटिंग पार्टनर म्हणून वावरत आहेत. त्यामुळे विकासकांना आपल्यावरील जबाबदारी झटकणे सहज सोपे होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ही बाब अदानी रिॲल्टीच्या येऊ घातलेल्या अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रकल्पाच्या जाहिरातीमुळे उघड झाली आहे. महारेराकडे प्रकल्पाची नोंदणी झालेली नसतानाही नोंदणी लवकरच होणार असल्याचे सांगून हे मार्केटिंग पार्टनर ग्राहकांची नावे व तपशील नोंदवून घेत आहेत. या प्रकल्पात ४०० सदनिका असून त्यासाठी ४३०० ग्राहकांची नोंदणी झाली आहे. म्हणजे या प्रकल्पातूल सदनिकांची जाहिरात होण्याआधीच विक्री झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा >>> जोगेश्वरी टर्मिनसच्या कामाला आठ महिन्यानंतर सुरुवात ; रेखाचित्र तयार करण्याचे काम सुरु मेल-एक्स्प्रेस गाड्या सुटणार
याबाबत मुंबई ग्राहक पंचायतीने पुढाकार घेऊन महारेराकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप महारेराने अद्याप तक्रारीची दखल घेतलेली नाही. मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले की, महारेरामध्ये नोंदणी झाल्याशिवाय प्रकल्पाची कुठल्याही पद्धतीने जाहिरात करण्यावर बंदी आहे. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर महारेराने तात्काळ कारवाई करणे आवश्यक होते. आपण महारेराला आणखी एक स्मरणपत्र पाठवणार आहोत. मार्केटिंग पार्टनर हे जर महारेराकडे एजंट म्हणून नोंदणीकृत नसतील तर ते अधिकृत नाहीत. महारेराकडे प्रकल्पाची नोंदणीच नाही तर जाहिरात करणे वा माहिती प्रसारीत करणे हे बेकायदा आहे. गोरेगावच्या पत्राचाळ प्रकल्पात महारेराची नोंदणी नसल्यामुळे आता रहिवाशांना कोणी वालीच राहीलेला नाही. अदानी जर मार्केटिंग पार्टनरवर खरेदीविक्री सोपविणार असेल तर उद्या ग्राहकांची फसवणूक झाली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल ॲड. देशपांडे यांनी केला आहे .
हेही वाचा >>> अपंगत्व येऊनही आपल्या ब्रिगेडचे नेतृत्व करणाऱ्या योद्ध्याची चित्तरकथा!
कंपनीचे प्रवक्ते अभिजित कुमार सांगतात की, महारेराकडे लवकरच प्रकल्पाची नोंदणी होणार आहे. त्यामुळे कंपनीकडून अधिकृत जाहिरात करण्यात आलेली नाही. चॅनेल पार्टनरकडून तसे होत असेल तर त्यांच्याशी आमचा संबंध नाही, असे अदानी रिॲल्टीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. म्हणजे जे काही मार्केटिंग पार्टनरकडून सुरू आहे त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली तर त्यांना कोणाकडे दादही मागता येणार नाही, याकडे मुंबई ग्राहक पंचायतीने लक्ष वेधले आहे. याबाबत महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता तसेच सचिव वसंत प्रभू यांचा संपर्क होऊ शकला नाही. लघुसंदेशालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.