महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि या शहराच्या वेशीवर वसलेले ठाणे ही दोन शहरे गेल्या दोन दशकांत प्रचंड वाढली. त्यामुळे या दोन्ही शहरांतील बांधकाम व्यवसायाला प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली, पण या व्यवसायात आणि घरबांधणीत कोणतीही सुसूत्रता नाही. याच प्रश्नाचा ऊहापोह करून समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवार, १९ मे रोजी ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह’ होत आहे. मुंबई व ठाणे ही दोन्ही शहरे अधिक सुनियोजित कशी करता येतील, लोकांना रास्त दरात चांगली घरे कशी उपलब्ध करून देता येतील याची चर्चा त्यात होणार आहे. या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत.
‘लोकसत्ता’च्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रवेश केवळ निमंत्रितांसाठी आहे. या कॉनक्लेव्हमध्ये प्रामुख्याने मुंबई-ठाणे शहरांच्या विकास योजनेवर चर्चा होणार आहे. त्यात बांधकाम व्यावसायिक, सरकारी अधिकारी, बँकर्स आणि वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. नियोजनबद्ध टाऊनशिप आणि इमारती, एकमेकांशी जोडलेले रस्ते, शहरातील हरितपट्टे, बागा, नसíगक आपत्तीपासून वाचण्यासाठीच्या उपाययोजना, बँक आणि वित्तपुरवठा याबाबत येणाऱ्या अडचणी, सुरक्षा आणि सुव्यवस्था याबाबतचे उपाय अशा विविध मुद्दय़ांचा परामर्श चच्रेत घेण्यात येईल. या कार्यक्रमाला ‘रिजन्सी इस्पात प्रा. लि.’चे सहकार्य लाभले आहे. या चच्रेचे सविस्तर वृत्तांकन ‘लोकसत्ता’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये केले जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2015 रोजी प्रकाशित
मुंबईत १९ मे रोजी रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि या शहराच्या वेशीवर वसलेले ठाणे ही दोन शहरे गेल्या दोन दशकांत प्रचंड वाढली.

First published on: 17-05-2015 at 04:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real estate conclave in mumbai