डोंबिवली जवळील पिसवली गावात सोमवारी दुपारी प्रशांत कातळकर या तरूणाने एका तरूणीवर एकतर्फी प्रेमातून चाकूने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. तिला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेजारच्या आई व मुलालाही त्याने जखमी केले. नंतर तो फरार झाला.
प्रशांतचे पिसवली गावातील चेतना शाळेजवळ राहणाऱ्या एका तरूणीवर एकतर्फी प्रेम होते. ती अन्य एका तरूणाबरोबर मैत्री करीत असल्याचे निदर्शनास येताच यापूर्वी प्रशांतने त्या तरूणीला जाब विचारला होता. पण तिने प्रशांतला धुडकावून लावले होते. त्यावेळीही प्रशांतला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती.
मैत्रीण आपल्याला दाद देत नाही याचा राग मनात असल्याने प्रशांतने त्या तरूणीच्या घरात कोणी नाही हे बघितल्यावर घरात घुसून तिच्यावर वार केले. तिला सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेजारच्या आई व मुलावरही प्रशांतने वार केले. या तरूणीवर कल्याणच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघींवरही या आरोपीने हल्ला केल्याने फरार होण्यात तो यशस्वी झाला. पोलीस फरार प्रशांतचा शोध घेत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2012 रोजी प्रकाशित
एकतर्फी प्रेमातून तरूणीवर हल्ला
डोंबिवली जवळील पिसवली गावात सोमवारी दुपारी प्रशांत कातळकर या तरूणाने एका तरूणीवर एकतर्फी प्रेमातून चाकूने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. तिला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेजारच्या आई व मुलालाही त्याने जखमी केले. नंतर तो फरार झाला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-11-2012 at 03:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reason of one side love attack on one girl