राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, जनशताब्दी तसेच दुरांतो एक्स्प्रेस या गाडय़ांमधील खानपानाची सोय असलेल्या गाडय़ांसाठी येत्या १ एप्रिल २०१२ पासून केवळ तिकीटाच्या दरामध्येच सवलत देण्यात येणार आहे. तिकीट शुल्क,अन्य सेवा तसेच कराच्या रकमेमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, खेळाडू यांना तिकीट दरामध्ये सलवत देण्यात येते. ही सवलत संपूर्ण तिकीटाच्या रकमेवर असते. यात गाडीतील खानपान सेवा, आरक्षण, सुपरफास्ट गाडी असेल तर त्याचा दर त्याचप्रमाणे कर यांचाही समावेश असतो. मात्र १ एप्रिल २०१३ पासून केवळ तिकीटाच्या मूळ भाडय़ावरच सवलत देण्यात येणार आहे. खानपानादी सेवांचे दर तसेच ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.   

Story img Loader